कोल्हापूर : भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेत भाजपाला धुळे-नंदुरबार विधानपरिषदेची जागा तर काँग्रेसला कोल्हापूर विधानपरिषद जागा देण्याची चर्चा झाली होती. त्यानुसार भाजपाचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते तथा कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, राज्य पातळीवरील नेत्यांनी सामंजस्य दाखवलं आणि चर्चा केली त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणुकीतील विरोध वैयक्तिक पातळीवर नसावा ही आमची भूमिका असल्याचेही यावेळी सतेज पाटील म्हणाले. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
या निवडीबद्दल काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांनी सतेज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulations @satejp Ji pic.twitter.com/k8TiJZRD0k
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) November 26, 2021
४१५ मतदार या निवडणूकीत मतदान करणार होते. ही निवडणूक चुरशीची ठरणार होती, त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केली होती. मात्र टप्प्यावर पोचलेल्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सतेज पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. पक्षश्रेष्टीकडून आदेश मिळताच महाडिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
महत्वाच्या बातम्या
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

