Share

तयारी तिसऱ्या लाटेची! औषधी खरेदीसाठी पालिकेची दोन कोटींच्या निधीची मागणी

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता यंत्रसामग्री व औषधी खरेदीसाठी मनपाला दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून द्यावा, यासाठी पालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

या निधीतून व्हिटीएम किट, रॅपीड अ‍ॅण्टिजेन किट, आरटीपीसीआर किट, बालकांसाठी बालकांसाठी लागणारे औषधी, विविध प्रकारच्या गोळया, व्हेंटिलेटर, बायपॅक मशिन, लहान व्हेटिलेटर, यंत्रसामुग्री आदींचा सामुग्री या दोन कोटींतून खरेदीचे नियोजन आहे. हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून उपलब्ध करुन द्यावा, याकरिता पालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

आगामी दोन महिन्यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेने तिसर्‍या लाटेत बालकांना धोका असल्याचे लक्षात घेऊन गरवारे कंपनीत बाल कोविड रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच एमजीएममध्ये देखील बाल कोविड रुग्णालय उभारले जात आहे. मेल्ट्रॉनमध्ये ५० खाटांची बालकांसाठी व्यवस्था देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!