Share

प्रीति झिंटाने मातृत्वाचा आनंद घेत शेअर केला बाळाचा खास फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणून प्रीति झिंटा (Preity Zinta) ओळखली जाते. तिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या प्रीति ही मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. गेल्या महिन्यात प्रीतिने सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाल्याची माहिती दिली होती. यानंतर आता तिने त्या दोन बाळांपैकी एका बाळाची झलक दाखवली आहे.

नुकतंच प्रीतिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिच्या बाळाला घेऊन बसल्याचे दिसत आहे. यात बाळाचा चेहरा दिसत नाही. मात्र प्रीतिने त्याला निळ्या रंगाचे टोपी आणि त्याच रंगाच्या चादरीमध्ये गुंडाळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आई झाल्याचा आनंद काय असतो हे प्रीतिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे प्रीतिने हा फोटो शेअर करत त्याला अनोखे कॅप्शन दिले आहे. “बर्प क्लोथ्स, डायपर्स अँड बेबीज, मला हे सर्व आवडतंय,” असे तिने यात म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CXLUlf0l90U/?utm_source=ig_web_copy_link

प्रीतिने शेअर केलेल्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींकडून ‘फार छान’, ‘सुंदर’, ‘अभिनंदन’ अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. दरम्यान प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत (Jean Goodinf) गुपचूप लग्न केले. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजलसमध्ये (Los Angeles) अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. तिला सरोगसीद्वारे जुळ्याची मुले झाली आहेत. त्या दोघांची नावे जय आणि जिया (, Jay and Jia) अशी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!