Share

आता तरी राऊतांनी बेलगाम वक्तव्ये टाळावित- प्रविण दरेकर

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसाठी खुर्ची उलचलून आणतानाची फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटो वरुन भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. फोटोचे स्पष्टीकरण देत असताना संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत भाजपच्या कार्यकर्त्यांना चुXXगिरी बंद करा, असे म्हणाले होते. त्यावरुन भाजपही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली असून संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणीही दीप्ती रावत यांनी केली आहे. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.

अति तिथे माती असते. विरोधीपक्षाबाबत घृणास्पद, टोकाची तिरस्कृत टीका करणाऱ्या संजय राऊतांच्या बेताल वक्तव्यांची दखल दिल्लीत घेतली गेली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आता तरी राऊतांनी समजून घ्यावं, देशात लोकशाही आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

ज्या लोकशाहीला आपण चंचल बोलता ती चंचल नसून अचल आहे. आपण चंचलपणे बेजबाबदार वक्तव्य करत आहात. तेव्हा यांतून बोध घ्यावा आणि बेलगाम वक्तव्य टाळावित, असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!