मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या सरकारला फक्त दारुड्यांची काळजी आहे. उद्याची पिढी बरबाद होईल याची त्यांना पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर सुपर मार्केटमध्ये वाइन विकण्याचा व्यभिचार एका अर्थाने हे सरकार करत आहे’, अशी टीका दरेकरांनी केली आहे. तसेच शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय असल्याचेही ते म्हणाले आहेत.
राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या सरकारला फक्त दारुड्यांची काळजी आहे. उद्याची पिढी बरबाद होईल याची त्यांना पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर सुपर मार्केटमध्ये वाइन विकण्याचा व्यभिचार एका अर्थाने हे सरकार करत आहे.(1/2) pic.twitter.com/M7F4vqChXs
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 27, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली काल(२७ जाने.) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
“निःस्वार्थ समाजसेवेच्या व्यसनातून डॉ.अवचट यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले”
“भाजपचा विरोध खोटेपणावर आधारित”, टिपू सुलतान वादावरून नवाब मलिकांनी दिला भारतीय संविधानाचा संदर्भ
योगी सरकारच्या काळात दरोड्यांमध्ये ७० तर चोऱ्यांमध्ये झाली ७२ टक्क्यांची घट- अमित शहा
दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा रणंजी करंडक स्पर्धेचे नियोजन
“दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?”, राम सातपुतेंचा हल्लाबोल


