मुंबई : मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार आहेत. कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे.
तसेच अनुसूचित जाती-जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातात आरक्षण दिले जाते व ते कमी करता येत नाही. अशावेळी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले तर ओबीसी व मराठा समााजाच्या आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता आहे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. किमान समान कार्यक्रम ठरवताना मुस्लिम आरक्षणही शिवसेनेने मान्य केले होते असे नवाब मलिक यांच्या वक्तव्यावरून दिसते, असे ते म्हणाले.
दरम्यान विधान परिषदेत नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत आघाडी सरकारची सकारात्मक भूमिका मांडली. तीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.


