Share

करोनाविरुद्धच्या लढाईसाठी BCCIने दिले तब्बल ‘एवढे’ कोटी

Published On: 

नवी दिल्ली : करोनाचे संकट भारतात देखील आले असून ते दिवसेदिवस वाढत चालले आहे. केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा संकटाच्या काळात अनेक जण राज्य आणि केंद्र सरकारला आर्थिक मदत केली आहे.करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने ५१ कोटींची मदत करण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि अन्य अधिकाऱ्यांनी मिळून भारतीय लोकांच्या सुरक्षेसाठी आणि करोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ५१ कोटी देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टतर्फे एकूण दीड हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय उद्योगपती आनंद महिंद्रा, अनिल अगरवाल यांनीही पुढाकार घेत मदत केली आहे.

भाजप खासदारांची खासदार फंडातून केंद्रीय सहाय्यता निधीत एक कोटींची मदत करण्यात आली आहे. तर पंकजा मुंडेंकडून पंतप्रधान सहाय्यता निधीस 25 लाखांची मदत देण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदार निधीतून दिला दीड कोटीचा निधी दिला आहे.

अभिनेता अक्षय कुमारकडून केंद्रीय सहाय्यता निधीत 25 कोटींची मदत केली आहे. तसेच अभिनेता वरुण धवनकडून देखील केंद्रीय सहाय्यता निधीस 55 लाखांची मदत देण्यात आली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून 2 कोटींची मदत जाहीर केली.शिर्डी साई संस्थानाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 कोटींची मदत दिली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी 1 महिन्याचं वेतन केंद्रसरकारच्या मदतनिधीला देणार आहेत तर शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. जेजूरी मार्तंड देवस्थानाकडून ससून हॉस्पीटलच्या आसोलेशन वार्डला 51 लाखांची मदत केली आहे.

पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्या फंडातुन कोरोना प्रतिबंधात्मक उपायासाठी पन्नास लाखाचा निधी जाहीर करण्यात आला असून ‘बजाज’ ग्रुपकडून १०० कोटी देण्यात आले आहेत.युनिलिव्हरकडून 100 कोटी तर मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री निधीला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे.साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांची मदत केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!