Share

ऐतिहासिक कर्जमाफी : ठाकरे सरकारवर कौतुकाचा वर्षाव !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक गुड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे.

राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसले होते. त्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र उद्धव ठाकरे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असे म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंतच कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारात या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला.

यावर आता राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष करण कोकणे यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. काल हिवाळी अधिवेशन पार पडले यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2 लाखांपर्यंत कर्ज माफीची घोषणा केली आहे. ही कर्ज माफी इतिहासिक कर्जमाफी आहे. कारण या अगोदर भाजप सरकारने ज्या वेळी कर्जमाफी केली ती केवळ शेतकऱ्याची फसवणुक केली होती . अजितदादा पवार यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते की जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा सहा महिन्यात आम्ही सातबारा कोरा करू असा शब्द दिला होता. ही कर्जमाफी 70 ते 75 टक्के शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे. अजितदादा पवार हे दिलेला शब्द पाळतात असा विश्वास जनतेत दिसत आहे. या कर्ज माफी बद्दल आम्ही पूर्णपणे समर्थन करत आहोत. अस कोकणे म्हणाले आहेत.

दरम्यान, राजू शेट्टी म्हणाले आहेत की 2 लाख माफ केल्याने सातबारा कोरा होत नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी सरकार याबद्दल दखल घेईल असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. राजू शेट्टी साहेब जे बोलले त्याबद्दल सरकार व मुख्यमंत्री नक्कीच दखल घेतील. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या पुढच्या काळात शेतकरी कर्ज मुक्त होईल अशी अपेक्षा करतो. सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे म्हणून सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच आधार मिळाला आहे .आणि या कर्जमाफी मध्ये कोणतीही अट नाही त्यामुळे याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे . अस देखील करण कोकणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1208626873908920321?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1208665976809508864?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!