Share

Prataprao Jadhav | “चार पाच टाळक्यांनी गाडीवर दगड मारायचा अन् …”; प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : पुण्यातील कात्रज परिसरात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केल्याचं म्हटलं जात आहे. कारण याच परिसरात काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा देखील होती. त्याचवेळी त्या भागातून जाणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीच्या ताफ्यावर उपस्थितांनी हल्ला केला. त्यामुळे हल्ला करणारे हे शिवसैनिकच होते, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या हल्ल्याचा शिंदे समर्थकांनी निषेध केला आहे. त्यावरच शिंदे गटातील नेते प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

“कुणीतरी चार पाच टाळक्यांनी गाडीवर दगड मारायचा, हा काही हल्ला नाही. पण जी घटना घडली त्याचा निषेध करतो. राजकारण हि विचारांची लढाई आहे. ती विचारानेच लढली पाहिजे. आम्हाला वारंवार गद्दार म्हटलं जातंय पण जनता ठरवेल कि कोणाची भूमिका योग्य आहे. शिंदेंची कि ठाकरेंची. आम्ही त्यांच्यावर प्रखर टीका करत नाही म्हणून त्यांनी गैरफायदा घेऊ नये.”, असा इशारा प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिला आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका देखील केली. आदित्य ठाकरे आता जसे दौरे करत आहेत तसे जर गेल्या अडीज वर्षात केले असते तर आज शिवसेनेनवर हि वेळ आलीच नसती, असं ते म्हणाले.

सुभाष देसाईंचे समर्थन
सामंत यांच्यावरील हल्ला ही उस्फुर्त प्रतिक्रिया आहे, असं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. देसाई म्हणाले कि, “अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता राज्यात सर्वत्र उमटत आहेत. कारण जनतेला हे आवडलेलं नाही. गद्दारी करून जर कुणी फिरत असेल तर केवळ शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्य माणूसही संतप्त होणारच. या सर्व उस्फुर्त प्रतिक्रिया आहेत. पण तरीही कुणी कायदा हातात घेऊ नये. काही चुकीचं वागू नये, असा माझा सल्ला आहे. परंतु या प्रतिक्रियांमागच्या लोकांच्या भावना या तीव्र आहेत.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!