Share

नितीशकुमार यांचे अभिनंदन करताना प्रशांत किशोर लगावला मार्मिक टोला

Published On: 

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनीही शपथ घेतली असून या दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

नितीशकुमार यांचे सरकार स्थापन झाल्यावर आज सकाळी ११.३० वाजता मंत्रमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या विभागांची विभागणी होणार असल्याचे समजते आहे. तसेच राजकीय आणि कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चर्चा होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

संयुक्त जनता दलाचे माजी नेते राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.’भाजपा नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनिंदन. राज्याला काही वर्षांपर्यंत एका थकलेल्या व राजकीयदृष्ट्या महत्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी तयार रहायला हवे.’ असे प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे.

पंतप्रधानांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करताना, ‘बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत नितीश कुमार यांचे अभिनंदन. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अन्य सर्व नेत्यांनाही माझ्या शुभेच्छा. बिहारच्या विकासासाठी एनडीए परिवार एकजुटीने काम करेल. बिहारच्या विकासासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत देण्याबाबत मी आश्वस्त करतो.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!