🕒 1 min read
मुंबई: करोनामुळे मार्च महिन्यामध्ये जाहीर झालेला लॉकडाउनला तब्बल ८ महिने पूर्ण होत आहेत. तब्बल आठ महिने बंद असलेली चित्रपट आणि नाट्यगृहे पासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.या काळामध्ये सर्वच क्षेत्रांवर मोठ्याप्रमाणात विपरीत परिणाम घडून आले तर अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. अर्थात कोरोनामुळे शारीरिक अंतराच्या नियमानुसार चित्रपट आणि नाट्यगृहे दोन्ही 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.
प्रत्येकाचं एक टार्गेट ठरलेलं असतं ना! अभिनय करणाऱ्या नव्या लाेकांचं करिअरपासून ते निर्मात्यांच्या गणितापर्यंत आणि अगदी बॅकस्टेज आर्टिस्टच्या जगण्यातील छाेट;्या व्यवहारापर्यंत. ते सगळंच पॉझ झालं हाेतं. तिसऱ्या-चाैथ्या लाॅकडाऊन शिथिलतेनंतर लगेचच नाटक सुरू करायला परवानगी दिली असती तर आज आपण बरंच पुढे गेलाे असताे. अस देखील दामले यांनी म्हटलं देशात145 दशलक्ष लोक सिनेमागृहाला पसंती देतात, 9000 स्क्रीन देशात यात एकल सिनेमागृहेसुद्धा, 600 सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स महाराष्ट्रात आहेत.
राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी बुधवारी त्यासंदर्भातला आदेश जारी केला. त्यानुसार, प्रतिबंधित क्षेत्र वगळता राज्यात चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर योगवर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश आणि शूटिंग रेंज या बंदिस्त गृहातील खेळांनाही सशर्त परवानगी दिली आहे. यासंदर्भातली सुनिश्चित कार्यपद्धती लवकरच जारी करण्यात येणार आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वधर्मीय धार्मिक स्थळे उघडली जातील अशी नागरिकांना आशा होती. मात्र दुसऱ्या लाटेच्या भीतीने सध्या प्रार्थनास्थळे कडीकुलपात ठेवण्याला आघाडी सरकारने प्राधान्य दिलेले दिसते.
महत्वाच्या बातम्या
- अन्वय नाईक प्रकरणावरून नवाब मलिक यांची भाजपवर सडकून टीका
- आजपासून जलतरण तलाव,चित्रपटगृहे होणार सुरु मात्र धार्मिक स्थळे राहणार बंदच
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- अर्णब प्रकरणावरून दिल्लीमध्ये रंगले पोस्टर वॉर

