नवी दिल्ली : गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. तर अनेक नेत्यांनी देखील अर्णब यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळत आहे. गोस्वामींच्या अटकेवरून दिल्ली मध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावूंन निषेध करत असल्याचं दिसून येत आहे.
भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर ‘आणीबाणी 2.0’ असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.
आपातकाल 2.0 pic.twitter.com/dkh1Ye0ubM
— Tajinder Bagga (@TajinderBagga) November 5, 2020
वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अर्णब यांच्यावतीने लगेचच कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
हत्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- आजपासून जलतरण तलाव,चित्रपटगृहे होणार सुरु मात्र धार्मिक स्थळे राहणार बंदच
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका


