मुंबई – वास्तुविषारद अन्वय नाईक प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अर्णब यांच्यावतीने लगेचच कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
अन्वय नाईक प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामी यांच्या बचावासाठी केंद्रातील मंत्री येत असतील तर या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे अर्नव गोस्वामी यांना आज अटक झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी बचावासाठी केलेल्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
आत्महत्या प्रकरणात आरोपीच्या बाजुने भाजपाचे केंद्रीय मंत्री ट्वीट करत असतील तर या देशाने मान्य करायचे का भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत असे ट्वीट करुन नवाब मलिक यांनी भाजपाला चांगलेच पेचात पकडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- आजपासून जलतरण तलाव,चित्रपटगृहे होणार सुरु मात्र धार्मिक स्थळे राहणार बंदच
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- अर्णब प्रकरणावरून दिल्लीमध्ये रंगले पोस्टर वॉर


