🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
अशातचं भाजपला पाठींबा दिलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने काम केलं आहे. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील. तसेच सत्ता स्थापन झाल्यानंतर सेनेचे २० ते २५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असं ते म्हणाले आहेत. दरम्यान ,माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आमदार रवी राणा यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
शेंडगे म्हणाले की, ”आमदार रवी राणा यांचा पूर्व इतिहास बघितला, तर अपक्ष म्हणून निवडून येतात. त्यानंतर जे सत्तेत असतात त्यांना चिकटून असतात. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुढील काळात रवी राणाच शिवसेनेमध्ये आलेले दिसतील. रवी राणा २५ आमदार फोडायची भाषा करत आहेत. आता ते दिवस गेले आहेत. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ कुणीही पाहू नये. आता शिवसेनेचा आमदार फोडणे सोपे नाही.’ असे म्हणत त्यांनी राणा यांना टोला लगावला.
यावर आता शिवसेना कमालीची आक्रमक झालेली दिसत आहे. त्याची ताकद आहे का गाढवाची रवी राणा मूर्ख माणूस आहे हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, त्यांना तू शिवसैनिकांना गद्दार बनवतो का ? शिवसैनिक फुटूच शकत नाही. असं परखड मत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, याविषयी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नगरविकास मंत्री असताना आ. रवी राणा हे माझ्या संपर्कात होते, ते कशासाठी संपर्कात होते हे सांगण्यासाठी रवी राणा यांनी माझं तोंड उघडू नये असं विधान करत राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच संजय राउत यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल संजय राऊतांवर बोलण्याएवढे रवी राणा मोठे नाहीत असं विधान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191689797133197314?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191699455260495872?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
