Share

कोरोनाच्या काळात उद्योगांचे मोठे नुकसान, तीच भरपाई करण्यासाठी केंद्राचे मोठे पॅकेज : जावडेकर

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या आर्थिक नुकसानीला भरून काढण्यासाठी 20 लाख करोड रुपयांच्य आर्थिक पॅॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार एवढ्या मोठ्या रक्कमेची तरतूद कशी करणार यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ABPमाझा या वृत्तवाहिनीशी बोलताना जावडेकर यांनी आर्थिक पॅॅकेजवर भाष्य केले.

ते म्हणाले की, देशातील सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना मजबूत करण्यासाठी हे पॅकेज आहे. अडचणीत असलेल्या उद्योगांना यामुळे चालना मिळेल. चार टप्प्यात केंद्र सरकारने घेतलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती मिळेल, आज त्याचा पहिला टप्पा होता.

तसेच रविवारपर्यंत थांबल तर लॉकडाऊन हे नाव तरी राहतं का हे पाहावं लागेल. रविवारनंतर अनेक सकारात्मक गोष्टी घडतील आणि सर्व व्यवहार पूर्वपदावर येतील. जिथे कारखाने सुरु झाले तिथे मजुर थांबले आहेत. त्यामुळे हा काही महिन्यांच्या अडचणीचा काळ आहे. भारत कोरोनाच्या संकटातून वाचला आहे, इतर देशाप्रमाणे भारतातील स्थिती नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं.

दरम्यान केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पी एम केअर फंडातून स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटींची तरतूद ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम केअर फंडमधील 2000 कोटी रुपयांत 50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेंटिलेटर भारतीय कंपन्यांनी तयार केलेले असणार आहेत. यामुळे कोरोनाच्या लढ्याला नक्कीच बळ येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘कोरोना’ हा मानवनिर्मित व्हायरस, नितीन गडकरींचा मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल, चंद्रकांतदादांना गाढा विश्वास

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!