नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. कोरोना हा नैसर्गिक व्हायरस नसून त्याला लॅॅबमध्ये तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
गडकरी म्हणाले की, कोरोना व्हायरस लॅबमधूनच आला आहे. तो नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम व्हायरस आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूसह जीवन जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. कोरोना विषाणू प्रथम चीनच्या वुहान शहरात दिसून आला आणि त्यानंतर तो जगभरात पसरला. हा नैसर्गिक विषाणू नाही, तो प्रयोगशाळेत बनविला गेला आहे. बरेच देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम करत आहेत, परंतु त्यात यश मिळालेलं नाही.
तसेच ते पुढे म्हणाले की, या विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची आधी ओळख पटणे आवश्यक आहे. या विषाणूला तात्काळ ओळखता येईल, अशी कार्यपद्धती शोधून काढण्याची गरज आहे. कारण हा व्हायरस कृत्रिम आहे, नैसर्गिक नाही. लवकरच भारत या विषाणूवर मात करेल. भारतासह अनेक देश लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत.
दरम्यान वुहानमध्ये सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार आता संपूर्ण जगभर झाला आहे. अनेक विकसित देशांना या कोरोनाने हतबल केले आहे. अमेरिकेला या व्हायरसचा मोठा फाटका बसला आहे. तर सध्या जगात 44 लाख 29 हजार 235 एवढे जण कोरोनाबाधित आहेत. तर त्यापैकी एवढ्या 2 लाख 98 हजार 165 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजनंतर पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं : PMO
#Aurangabad : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

