Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल, चंद्रकांतदादांना गाढा विश्वास

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल. शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय कर्मचारी, रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यावसायिक, लघू उद्योजक अशा सर्वांच्या सहभागाने देश आर्थिक महाशक्ती होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाम निर्धाराने कोरोनाच्या संकटकाळात देशाचे नेतृत्व करत असून त्यांना जनतेची साथ मिळालेली आहे. तशाच ठाम आत्मविश्वासाने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदीजींनी सोमवारी निर्णय जाहीर केला. देशाच्या सकल उत्पन्नाच्या दहा टक्के इतके ऐतिहासिक मोठे पॅकेज त्यांनी जाहीर केले आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळेल, विशेषतः कोरोनामुळे झळ पोहचलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना आधार मिळेल याची काळजी त्यांनी घेतली आहे.

पाटील पुढे म्हणाले, कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होऊन निराशा निर्माण झाली असताना मोदीजींच्या मंगळवारच्या संदेशामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांच्या मनात आशा निर्माण करणाऱ्या मोदीजींच्या घोषणेचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते.

ते म्हणाले की, भारताकडे अफाट मनुष्यबळ, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि फार मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या क्षमतेचा पूर्ण वापर होण्याची आणि भारत आत्मनिर्भर होण्याची दिशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे स्पष्ट झाली आहे. मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत स्वयंपूर्ण होईल आणि प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात चांगला बदल घडेल याची आपल्याला खात्री वाटते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!