Share

धनगरांच्या प्रश्नांसाठी पंढरपुरात आंबेडकरांनी ठोकला शड्डू; वंचित प्रस्थापितांना धक्का देणार?

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. मुख्य सामना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होण्याचं चित्र असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजासह धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंढरपुरात शड्डू ठोकला आहे. वंचिततर्फे बिरप्पा मोटे यांना उमेदवारी दिली असून यामुळे भाजपसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय मिळवणं अडचणीचं होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

‘पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे बिरप्पा मधुकर मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपने आरक्षणाच्या प्रश्नावर धनगरांची फसवणूक केली आहे. यांची उमेदवारीसुद्धा प्रस्थापित समाजाच्या प्रस्थापित घराण्यांबाहेर जात नाही. तसेच या पक्षांनी OBC जनगणनेला विरोध केल्याने OBC च्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची अधिकृत माहिती नाही. ही माहिती नसल्याचं कारण देत सुप्रीम कोर्टाने OBCचे राजकीय आरक्षण रद्द करणारा निर्णय नुकताच दिला. उद्या हेच कारण पुढे करून शिक्षण व नोकरीतील आरक्षण रद्द केलं जाऊ शकतं.’ असा गंभीर आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

यासोबतच, ‘या परिस्थितीत आपले अधिकार मिळवण्यासाठी, व आहेत ते शाबूत ठेवण्यासाठी तमाम धनगर, OBC व इतर वंचित समूहांना आवाहन आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मोटे यांच्या मागे आपली ताकत एकवटली पाहिजे.’ असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!