Share

भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास प्रकाश आंबेडकर यांची मानवंदना !

Published On: 

पुणे : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी मानवंदना दिली. 1 जानेवारी 1818 रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती यामध्ये 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशवांचा पराभव केला होता. या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ या विजय स्तंभाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते. दरवर्षी देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.

आज सकाळी 7 वा. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, अशोक सोनोने, वंचितचे प्रवक्ते, अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक आणि प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.

एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही तोपर्यंत कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दुसरीकडे कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदर व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!