🕒 1 min read
सोलापूर : राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी आता भाजपा पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेतर्फे राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी आंदोलन पुकारले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसह वारकऱ्यांना सोबत घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून हे आंदोलन करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर पंढरपूरात काल रात्री पासुनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त असला तरी आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. सुमारे आठशे ते हजार कार्यकर्ते यावेळी त्यांच्यासोबत असतील असा अंदाज वर्तवण्यात येत असून राज्यातील अनेक वारकरी संघटनांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
“पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
सामना अग्रलेख : भाजपाचा ‘घंटानाद’ धार्मिक कि राजकीय?
दरम्यान, पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच विरणार आहे. प्रकाश आंबेडकर काल काहीवेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली होती.
‘पवना’ धरण १०० टक्के भरले, मावळासह पिंपरी-चिंचवडकरांची चिंता मिटली!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

