Share

‘पवना’ धरण १०० टक्के भरले, मावळासह पिंपरी-चिंचवडकरांची चिंता मिटली!

Published On: 

🕒 1 min read

मावळ : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दिलासा मिळाला आहे. यंदा ऑगस्ट अखेर पवना धरण पूर्ण भरल्याने मावळातील कृषीक्षेत्रासह पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

काल, धरण भरल्यानंतर पवना नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तब्बल ६ दरवाजे उघडण्यात आले असून याआधीच भरलेल्या मुळशी धरणातून देखील विसर्ग सुरु आहे. त्यामुळे इंद्रायणी, मुळा ,पवना नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल २२०० क्युसेक वेगाने पवना धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला होता, तसेच पावसाचे जोर वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती पवना धरण नियंत्रकांनी दिली.

आघाडीत बिघाडी कायम! सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं? काँग्रेसची पोस्टरबाजी

सद्या पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने धरणातून नदी पात्रात २ हजार १६० क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली आहे. १ जून पासून पवना धरण परिसरात १ हजार ५६५ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून दरवर्षी वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता बंदी घालण्यात आली आहे. आज सकाळी, धरणात ८.४४ टीएमसी म्हणजेच ९९.१५ टक्के पाणी साठ्याची नोंद करण्यात आली आहे.

भक्ती-शक्ती संगम: श्रीसमर्थस्थापित सहावा मारुती – मसूरचे मारुतीराय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!