टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका दिसत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केंद्र सरकार हे ‘दारुड्यां’चं सरकार आहे. दारुडा जसे स्वतःचे पैसे संपल्यावर चोऱ्या करतो, घरातलं समान विकतो. तसचं केंद्र सरकार आता RBI च्या पैशावर डल्ला मारतंय अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. ते जालना येथे आयोजित बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलताना आंबेडकर यांनी ‘आतापर्यंत कोणीच असं केलं नाही. हे सरकार झिंगलेल्या माणसासारखे चालतंय. हम करे सो कायदा आणि विरोधात बोललं तर देशद्रोही अशी लेबलं लावली जात आहेत. RSS आम्हाला देशभक्ती शिकवतेय हे दुर्भाग्य आहे असंही विधान आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्यावर भाजपकडूनही जोरदार टीका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुढे बोलताना आंबेडकर यांनी पाकव्याप्त काश्मीरचं स्वतंत्र्य संविधान रद्द करून केंद्रशाशित प्रदेश जाहीर करताच पाकव्याप्त काश्मीरचा विषयच राहिला नाही. पाक युद्ध करणारच नाही. तर सरकार त्यांना प्रत्युत्तर कसं देणार असंही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
- तुरुंगातून पी.चिदंबरम यांची सरकारवर टीका,म्हणाले….
- पंकजा मुंडे आठशे कोटी रुपयांंच्या दारु कारखान्याच्या मालकीण : धनंजय मुंडे
- ‘पराभवाच्या छायेत असल्यानेच राष्ट्रवादीला आली छ.शिवाजी महाराजांची आठवण’
- ‘राजे, सरदार कितीही गेले तरी सामान्य माणसांच्या जीवावर राष्ट्रवादी तरेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

