🕒 1 min read
लातूर: राष्ट्रवाद हा प्रत्येकाच्या अंगात आहे. तो कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यात स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांचे हस्तक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर राष्ट्रवाद शिकवू नये, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.
वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन यात्रेनिमित्त रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अंजली आंबेडकर, यात्रेचे प्रमुख अण्णाराव पाटील, शिवानंद हैबतपुरे, नवनाथ पडळकर, प्रा. सुभाष भिंगे, राम गारकर, राजा मणियार, संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी हा बुडबुडा नाही, तर प्रवाह बनत चालला आहे. राज्यात वंचितांचे सरकार येऊ नये म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भारतीय जनता पक्षात जात आहेत. हा सत्तेचा लढा तर आहेच; पण सामाजिक लढा आहे. त्यामुळे एकत्र येण्याची गरज आहे. सरकारने जाणीवपूर्वक मंदी आणली आहे. हे सरकार पडल्याशिवाय मंदी हटणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.
भाजप सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. हे सरकार सत्तेतून खाली खेचल्याशिवाय देशात आणि राज्यात शांतता राहणार नाही. जे आपल्याला गृहीत धरतील त्यांच्याविरोधात मतदान करून राज्यात वंचितांचे सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील युती सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून द्या. 370 जातींना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर काम करीत आहेत. वंचित ही जात नाही, तो आता धर्म झाला आहे. वंचितांचे सरकार आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे, असे मत ऍड. अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले.
लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपवले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजप आणि शिवसेनेला संपवेल, असा विश्वास हैबतपुरे यांनी व्यक्त केला.
-
POKवर हल्ला करण्यासाठी लष्कर सज्जच आहे : लष्करप्रमुख बिपीन रावत
-
‘शरद पवार, अजिदादा भाजपात येतील की काय अशी शंका वाटायला लागलीय’
-
छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – रामदास आठवले

