सोलापूर : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातल्या राजकारण – प्रशासनातील गुन्हेगारी तत्व एकत्र येऊन काय करू शकतात? हे आपण पाहतोय. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने १०० कोटी कसे वसूल केले जातात याबद्दल खुलासा केलाय पण, आमच्यादृष्टीने ही रक्कमही कमीच आहे. हे मोठं जाळं तयार झालंय. आम्ही वंचितच्यावतीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून हे सभागृह बरखास्त करू नका पण, हे सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार आहोत. हे चोर, खुन्याचं सरकार आहे. असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते सोलापुरात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- “इशान किशन आणि सूर्यकुमार टॉप क्लास खेळाडू”
- एका वर्षानंतर सुशांतच्या आत्महत्येवर क्रितीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…..
- ‘स्व.आर.आर. आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृहखात्याला कलंकित केले’
- आज दिल्लीत अजित पवार, जयंत पाटील यांची शरद पवारांसह तातडीची बैठक
- तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट?, जुई गडकरीचा सवाल


