Share

मी संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार म्हणूनच त्यांच्यासोबत इथं बसलोय – प्रकाश आंबेडकर

Published On: 

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणे सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे हे आज शनिवारी वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षण हे अॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल होत आहे, पण इथला राज्यकर्ते ते मानायला तयार नाही.येणाऱ्या सरकारला आरक्षण मुद्दा त्रासदायक होईल नव्हे काहीवेळा राज्यसत्ता चालवायला अडचण येईल. राज्यकर्त्यांची इच्छा हवी होती रिव्ह्यू पिटीशन नाही तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींमार्फत करायला हवं. राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून पुनर्विचार याचिका करू शकतो. राज्यसत्तेशिवाय हे होणं अशक्य आहे.

तर, शरद पवारांचं राजकारण 40 वर्षं बघतोय, ते नरो-वा कुंजरो वा असं करतात. पण, सगळ्याच विषयात असं करून चालत नाही. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. आपण अपेक्षा करूया ते काहीतरी भूमिका घेतील. अस देखील आंबेडकर म्हणाले. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार म्हणूनच त्यांच्यासोबत इथं बसलोय. अस सूचक विधान देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले आहे.

दुसरीकडे, संभाजी छत्रपती यांनी  शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबतची रोखठोक भूमिका व्यक्त केली. त्याचबरोबर नव्या राजकीय पक्षाचं सूतोवाचही केलं. बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू. पण आता तो विषय नाही. सध्या मराठा आरक्षणाचा तिढा सुटणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या सूचक वक्तव्याने राज्यात नवा राजकीय पर्याय उदयास येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!