Share

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसेना कुठल्या तोंडाने मते देणार – आंबेडकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांनी प्रज्ञा ठाकूरला भाजपची उमेदवारी दिली. मात्र, २००८ च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र आपल्या शाखेत लावणाऱ्या शिवसेने शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वीचा साधा निषेध का नोंदवला नाही ? आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला मते देणार याचे उत्तर शिवसैनिकांनी द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. कुर्ला नेहरूनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

दरम्यान, शिवसेनेला भाजपच्या कुबड्यांची गरज का पडली? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी खोटारड्या मोदींना घरी बसवावे, पर्याय कोण याची काळजी करू नये. देशात लोकशाही आहे त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी मोदी स्वत:च्या कुटुंबाशी कसे वागले हे पाहावे. मोदींनी अजून रॉबर्ट वड्राला तुरुंगात का टाकले नाही? याचे उत्तर द्यावे. प्रियांका गांधी वाराणसीमधून मोदींविरोधात लढण्याचे सांगून नवऱ्याची काही प्रकरणे ‘सेटल’ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!