Share

प्रज्ञा सिंहांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची अजून एक नोटीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भोपाळ लोकसभेच्या भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने ७२ तास म्हणजेच ३ दिवसांची बंदी घातली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबरी मशिदीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई केली होती.

ही बंदी समाप्त होत नाही तोच त्यांना आणखी एका नोटीसीला सामोरे जावे लागत आहे. प्रचाबंदी दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंदिरात जाऊन भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने प्रज्ञा सिंह यांना दोन दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागितले आहे. निवडणूक आयोगाने प्रचारबंदी घातल्यानंतर गेल्या गुरुवारी त्यांनी भोपाळमधील मंदिरांमध्ये पूजा केली होती. तसेच, पूजा-अर्चा केल्यानंतर मंदिरात भजन गायले होते.

दरम्यान, या निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरही निवडणूक आयोगाने बंदी घातली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!