मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार तसेच बॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवलेला अभिनेता प्रभास हे नाव आता चाहत्यांसाठी नवीन राहिलेलं नाही. ‘बाहुबली’ चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला. प्रभासचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
एखाद्या सेलिब्रिटीला प्रसिद्धी मिळाल्यानंतर अधिक पैसा मिळवण्यासाठी ते ब्रॅण्डस् सोबत काम करतात आणि त्या ठराविक ब्रॅण्डस्चे प्रमोशन करतात, मात्र या सगळ्याला प्रभास अपवाद आहे. उगाच पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाहिराती करणं किंवा ब्रॅण्डस् सोबत जोडलं जाणं प्रभासला पटत नाही. त्यामुळे त्याने चक्क गेल्या वर्षभरात १५० ब्रण्डच्या जाहिरातींसाठी नकार दिला आहे.
प्रभासने गेल्या वर्षभरात कपड्यापासून इलेक्ट्रॉनिक तसचं एफएमसीजी अशा सर्वच क्षेत्रातील बड्या ब्रॅण्डच्या ऑफर नाकरल्या आहेत. प्रभास पूर्ण विचारपूर्वक निर्णय घेवून जाहिराती आणि ब्रॅण्ड निवडतो. निवडक ब्रॅण्डस् सोबतच तो काम करण्याला पसंती देत असतो. प्रभास लवकरच ‘राध्ये-श्याम’, ‘सलार’ आणि ‘आदिपुरुष’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सावधान ! ‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

