🕒 1 min read
मुंबई: कोणी सरकारविरुद्ध तक्रार केली की, ‘ ईडी’चा ससेमिरा लावायचा, धाडींवर धाडी घालायच्या, कोणी सत्य सांगणारी साक्ष दिली की, त्याच्या जिवावर उठायचे असेच एकंदरीत दिसते. प्रभाकरने आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांवर आठ कोटींच्या वसुलीचा आरोप लावला होता. त्यामुळे झोनल डायरेक्टर वानखेडे हे अडचणीत सापडले होते व त्यांना एनसीबीतून बाहेर जावे लागले. महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीतच देशात जे खूनशी राजकारण सुरू आहे ते अस्वस्थ करणारे आहे. प्रभाकर साईलने सत्य सांगितले नसते तर आर्यन खानप्रमाणे अनेक जण यापुढेही केंद्रीय यंत्रणांच्या मनमानीचे व खंडणीखोरीचे बळी गेले असते. असे शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण हे एक राजकीय षडयंत्र होते. ज्या पद्धतीने भाजपचे पुढारी त्या काळात केंद्रीय यंत्रणांची कड घेऊन भांडत होते, तो सर्वच प्रकार किळसवाणा होता. भाजपचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक संवेदना व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात, पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य वाटते. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच प्रभाकर हा क्रूझ ड्रग्ज प्रकरणातला प्रत्यक्ष साक्षीदार होता. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालविणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात प्रभाकर साईल निर्भयपणे उभा राहिला व शेवटपर्यंत तो सत्य बोलत राहिला. केंद्रीय तपास यंत्रणांचा खेळ त्याच्या साक्षीने कोलमडून पडला. मोदी (Narendra Modi) यांनीच पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे. अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोदी यांनी पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे; संजय राऊतांची मागणी
“टीका आणि नकला करण्याशिवाय त्यांना…”, राजे ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
IPL 2022 CSK vs PBKS : कशी नशिबानं थट्टा आज मांडली..! चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची हॅट्ट्रिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
