🕒 1 min read
मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना पार पडला आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. लियाम लिव्हिंगस्टोनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १८१ धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचे पाठलाग करताना चेन्नई ढासळली. पंजाबने चेन्नईचा ५४ धावांनी पराभव केला आहे. यासोबतच आता स्पर्धेत चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाबकडून (PBKS) लिव्हिंगस्टोनने (Livingstone) ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा केल्या. तर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावांचे योगदान दिले. मात्र पंजाबचे वर्चस्व असताना शेवटी चेन्नईच्या गोलंदाजीने त्याच्या सुसाट गाडीला ब्रेक लावत २०० पर्यंत पोचणाऱ्या धावसंख्येला १८१ वर थांबवले. मात्र चेन्नईची (CSK) फलंदाजी सुरुवातीपासूनच डळमळताना दिसली.
चेन्नईकडून सलामीला आलेला ऋतुराज सलग तिसऱ्या सामन्यात खराब कामगिरी करत केवळ १ धाव करून माघारी परतला. माध्यम फळीत उथप्पा आणि रायडूने पारी सांभाळायचे प्रयत्न केले. मात्र तेही माघारी परतले. ३० धावांच्या आत ४ विकेट्स पडल्यावर शिवम दुबेने येऊन अर्धशतक करत चेन्नईला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याला धोनीची (MS Dhoni) साथ लाभली. दुबेही बाद झाल्यानंतर फिनिशर माहीने आपली खेळी सुरूच ठेवली मात्र तोही चेन्नईला या पराभवापासून वाचवू शकला नाही. चेन्नई या हंगामात २०२० सारखी खेळी करत असल्याचा भास आता चाहत्यांना होत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2O22 : RCBमधून एक खेळाडू स्पर्धेबाहेर; ‘या’ खतरनाक खेळाडूला मिळाली संघात एन्ट्री!
- IPL 2022 CSK vs PBKS : लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी; पंजाबचं चेन्नईला १८१ धावांचं आव्हान!
- IPL 2O22 : जोस बटलरनं ठोकलं शतक; क्रेडिट कोणाला दिलं माहितीये? वाचून हसाल!
- “…तर नरेंद्र मोदींशीवाय पर्याय नाही”; संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल
- IPL 2022: पंजाबचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ आहे हिटमॅनचा फॅन; म्हणाला “मला त्याच्यासारखं खेळायचंय…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
