मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच असलेले के पी गोसावी यांचा बॉडीगार्ड असणाऱ्या प्रभाकर साईल यांचा समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारा व्हिडियो आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे प्रभाकर साईलने असे आरोप केले असावेत. त्यामुळे प्रभाकर साईलची चौकशी करावी. यामागे प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या समीर वानखेडे यांच्या विरुद्ध षडयंत्र असण्याची शक्यता आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
क्रूझ ड्रग पार्टी त्यावरील धाड आणि त्यातुन पुढे आलेले आर्यन खान ड्रग्स प्रकरणी प्रभाकर साईल याने व्हिडियो द्वारे समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. 18 कोटींना डिल झाले असे बदनामी करणारे गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्यावर त्याने केले आहेत. त्याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान जेल मध्ये गेल्यानंतर अनेक दिवसांनी असा आरोप करणारा व्हिडियो प्रभाकर साईलचा पुढे आला आहे.
साईल याने केलेले आरोप महाविकास आघाडी सरकार च्या दबावातून केलेले असावेत.समीर वानखेडे सारख्या प्रामाणिक कर्तबगार अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे षडयंत्र प्रभाकर साईल च्या व्हिडीओ मागे दिसत आहे अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियावर खेळ खेळत बसण्यापेक्षा पुरावे द्या’; क्रांतीचे मलिकांना प्रत्युत्तर
- ‘गृहमंत्री काश्मीरमध्ये असताना पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव साजरा’ संजय राऊतांचे टीकास्त्र
- नवाब मलिक लवकरच रिलीज करणार ‘स्पेशल २६’
- ‘सुभाष साबणे यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या राज्य सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका’
- ‘ट्विटर कोर्ट आहे का?’; क्रांती रेडकरने मलिकांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

