Share

सत्तेचा माज : सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली ‘लाइव्ह शो’मध्ये पत्रकाराला बेदम मारहाण

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- : पाकिस्तानात एका न्यूज चॅनेलवर लाइव्ह शो दरम्यान सत्ताधारी पीटीआय पक्षाच्या एका नेत्याने पत्रकाराला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाइव्ह शो दरम्यान झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केलेल्या या प्रकारावर पाकिस्तानमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानच्या ‘के २१ न्यूज’ या वृत्तवाहिनीवर ‘न्यूज लाइन विथ अफताब मुघेरी’ हा शो सुरू होता. या पॅनल चर्चेत पीटीआय पक्षाचे नेते मसरूर अली सियाल आणि कराची प्रेस क्लबचे प्रमुख इम्तियाज खान सहभागी झाले होते. यावेळी चर्चचे रुपांतर वादात झाले आणि यानंतर तुंबळ हाणामारी झाली. लाइव्ह शोमध्येच ही हाणामारी झाल्याने या हाणामारीवर पाकिस्तानमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पत्रकारावर झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाचा माज दाखविणारा असल्याची टिका आता पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर होऊ लागली आहे. तसेच खान यांच्या स्वप्नातील हाच का तो नवा पाकिस्तान ? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!