मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या दोन विभागांचे विलीनीकरण करून डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज असा नवीन विभाग प्रस्तावित करण्यात आला होता. त्यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. दोन विभागांच्या विलीनीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होत होता.
दरम्यान आता रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर तसेच विद्यार्थ्यांकडून सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट ही मोहिम राबवण्यात आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याच्या डेक्कन परिसरात असणाऱ्या या इन्स्टिट्यूटचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थलांतरित करण्यात येणार होतं. मात्र, या स्थलांतरावरुन रानडे इन्स्टिट्यूटचं महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी केला होता.
रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोपही इन्स्टिट्यूट बचाव कृती समितीनं केला होता. दरम्यान आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक जारी करून रानडे इन्स्टिट्यूटचे विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे आता हा वाद थांबेल असेच मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणे’, प्रविण दरेकरांची भूमिका
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होणे अशक्य’, सिरमच्या सायरस पूनावालांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

