मुंबई : एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पाच वर्षापूर्वी झालेल्या निक्रृष्ट दर्जाच्या चिक्की वाटप घोटाळ्यात अद्यापही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. भाजपचे सरकार असताना घडलेल्या या चिक्की घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पंकजा मुंडेंची बाजू घेतली आहे. ‘मुंबई उच्च न्यायालयाने चिक्की प्रकरणात कंत्राटदारावर एफआयआर का दाखल केला नाही, अशी विचारणा केली आहे. परंतु त्याचा पंकजा मुंडे यांच्याशी काहीएक संबंध नसून या प्रकरणाविषयीचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत दिले होते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कृत्याचा आरोप थेट मंत्र्यावर करणे योग्य नाही. शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे
एखाद्या गोष्टीत मंत्र्याचा थेट हस्तक्षेप होऊन जर घोटाळा झाला असेल तर आरोप करता येतात. पण प्रशासकीय कंत्राटदाराकडून गैरव्यवहार झाले असतील तर त्याला ते जबाबदार असतात. त्यामुळे मंत्र्याची चूक नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. यासंदर्भात त्यावेळी विधिमंडळात गदारोळ झाला. प्रसिद्धी माध्यमातून चुकीचे चित्र उभे करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सभागृहात यासंदर्भात योग्य ते स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे आता यामध्ये काही तथ्य नसून पंकजा मुडे यांच्या अडचणीत वाढ होणार नाही, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालय काय म्हणाले आहे मला माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाला राज्यपाल कोश्यारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होणे अशक्य’, सिरमच्या सायरस पूनावालांचे मोठे वक्तव्य


