Share

बॉलीवूडने केली पुन्हा साऊथची कॉपी अक्षय कुमारच्या ‘मरजावा’ गाण्याचे पोस्टर सापडले वादात

Published On: 

मुंबई : दक्षिणेत बनलेल्या अनेक चित्रपटाचे बॉलीवूडमध्ये रिमेक बनले आहेत. आजही अनेक निर्माते दाक्षिणात्य चित्रपटाचे हक्क विकत घेतात किंवा त्याची कॉपी बॉलिवूडमध्ये बनवतात. आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आगामी बेल बॉटम चित्रपटातील ‘मरजावा’ या गाण्याचे पोस्टरही दक्षिणात्य चित्रपटातुन कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे.

https://www.instagram.com/p/Bw9-B8NBla5/?utm_source=ig_embed&ig_rid=3d268f90-56fa-456c-8643-a1c71933e67d

बॉलिवुड सातत्याने या ना त्याप्रकारने बॉलिवूड दाक्षिणात्य आणि हॉलीवुडच्या चित्रपटाची सर्रास कॉपी करताना आढळतात. अक्षयच्या बेल बॉटममधील मरजावा या गाण्याचे पोस्टरही प्रभासचा आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटातील पोस्टरशी साम्य असल्याचा आरोप केला जात आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूर एका धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहुन बाहेर झुकलेले दिसत आहे. अशाच प्रकारचे पोस्टर प्रभास आणि पुजा हेडगे यांच्या राधे श्याम या चित्रपटाचे काही दिवसापुर्वी प्रदर्शीत झाले होते.

https://www.instagram.com/p/CSN1yh7Iy9q/?utm_source=ig_embed&ig_rid=2ebe390a-0fa9-4f96-af27-ab82a7d6f233

ट्रॅव्हल ब्लॉगर कॅमिल आपल्या पतीसोबत २०१९ मध्ये श्रीलंकेत गेलेली असताना तिने आपल्या पतीसोबत एक रोमॅण्टिक पोज देतानाचा असाच फोटो शेअर केला होता. तो फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्या फोटोशी बेलबॉटमचे हे पोस्टर साम्य राखत असल्याने  प्रदर्शनापुर्वीच बेल बॉटम वादात सापडण्याची शक्यता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे रखडलेला हा चित्रपट येत्या १९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात अक्षय कुमार, वाणी कपुर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

https://www.instagram.com/tv/CGrQI_NJ-lu/?utm_source=ig_embed&ig_rid=e40da131-139d-434d-863a-e4de793f1b08

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!