Share

सकारात्मक! लातूर मधल्या या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात

Published On: 

🕒 1 min read

लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जरी असली तरी देखील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. तसेच गुरुवारी जवळपास १ हाजार रुग्णांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी सुखरूप गेले असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये वृद्ध आजी-आजोबा देखील आहेत, केवळ योग्य उपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही होऊ शकत याचं चांगलं उदाहरण या आजी आजोबांनी दाखवून दिलं आहे.

चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी येथील वयोवृद्ध आजी-आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करत संसर्गजन्य कोरोना आजारावर मात केली असून त्यांनी सर्वासमोर आदर्श ठेवला आहे. लिंबाळवाडी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमातून कोरोनाची लागण झाली होती. जवळपास एक हजार लोकवस्तीच्या गावामध्ये १९४ जणांची कोरोना चाचणी पाँझीटिव्ह आली होती. यामध्ये वयोवृद्ध संग्राम बिराजदार (वय ८०) व त्यांची पत्नी मथुराबाई बिराजदार (वय ७६) यांना कोरोनाची लागण झाली होती.

वयोवृद्ध असल्याने यांना उपचारासाठी चाकूर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दोघांनी एकमेकांना आधार देत डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करून वेळेवर औषधे घेतली. मथुराबाई यांना काही दिवस ऑक्सिजन लावावा लागला; पण त्यांनी खचून न जाता कोरोनावर मात केली. कोरोनाची बाधा झाल्यानंतर अनेकांचे भीतीने हातपाय गळून जातात. पण या वयोवृद्ध दाम्पत्याने सकारात्मक विचार ठेवले. यांनी केवळ आठ दिवसात कोरोनाला हरविले. या वयात कोरोनाने संक्रमित झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते.

दोघांनीही न घाबरता या आलेल्या संकटाला तोंड द्यायचे ठरवले व नियमित उपचाराला ते उत्तम प्रतिसाद देत असल्याने आणि मनाने ते जरासेही खचले नसल्याने औषधीचा चांगला परिणाम त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागला. या सकारात्मक विचाराने ते आठ दिवसात कोरोनातून बरे झाले. त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली व या दोघांना सुट्टी देण्यात आली. मथुराबाई व संग्राम बिराजदार या दोघांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर अंगावर न काढता तपासणी केली. यांनी उपचाराला व्यवस्थित प्रतिसाद दिला. दोघांतील असलेली प्रतिकारशक्ती खूप कामाला आली. यामुळेच लवकर कोरोनावर मात केली. कुणालाही कोरोनाचे लक्षण असतील तर अंगावर न काढता तत्काळ तपासणी करून घ्यावी, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना पडंगे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!