औरंगाबाद : शहरातील महापालिकेच्या पदमपुरा भागातील कोविड केअर सेंटरखाली गुरुवारी (दि.२९) रात्री उशिरा अचानक महावितरणच्या ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला. त्यामुळे अचानक आग आणि झालेला मोठा आवाज ऐकून कोविड सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.
पालिकेच्या पदमपुरा येथील अग्निशमन विभागासमोर कोविड केअर सेंटर आहे. या कोविड केअर सेंटरची इमारत मुख्य रस्त्याला लागूनच आहे. इमारतीच्या खाली बाजूलाच महावितरणचा मोठा ट्रान्सफार्मर आहे. कोरोना चाचणीसाठी आलेले काही लोक रात्री ८ वाजेच्या सुमारास कोविड सेंटरच्या इमारतीखाली उभे होते. त्याचवेळी अचानक ट्रान्सफार्मरचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वरच्या मजल्यावरील कोरोना रुग्णही भयभित होऊन त्यांनी खाली धाव घेतली.
स्फोटानंतर ट्रान्सफाॅर्मरमधून आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे जमिनीवरील गवत आणि कचऱ्यानेही पेट घेतला. ट्रान्सफाॅर्मर असल्यामुळे आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करता आला नाही. त्यामुळे बाजूच्याच अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी अग्निशामक यंत्रासह तिथे धाव घेत तातडीने स्प्रेचा मारा करत आग नियंत्रणात आली. यावेळी संदीप बारवाल यांच्यासह इतर काही नागरिकांनीदेखील आग विझविण्यासाठी मदत केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, परिसरात अंधार झाल्याने परिसरातील नागरिकांतही यामुळे खळबळ उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील शाळांना १ मे पासून सुट्टी, तर नव्या शैक्षणिक वर्षाबाबत शासनाचा महत्वाचा निर्णय !
- रेमडेसिवीर चोरी प्रकरण! आज होणार फैसला
- लसीकरणाचा तुटवडा संपवण्यासाठी लातूर मनपा लस खरेदी करेल का ?
- ‘रोहित सरदाना खोटारडा होता, तो आठवणीत राहणार नाही’, शरजील उस्मानीचे वादग्रस्त ट्विट
- राज्यात वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा खेचून नेतायत; फडणवीसांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
