Share

माळावरच बहुजनाच पोरगं पवारांना नडलं , ते तुम्हाला एवढं का झोंबल ?

Published On: 

🕒 1 min read

विजय वावरे : बहुजनांच नेतृत्व राजकारणात आलं की पवारांच्या पोटात दुःखत हे लहानपणापासून ऐकत आलो, पण आज प्रत्यक्षात बघितलं. धनगरांच्या आरक्षणाच घोंगड पवारांनी आतून विरोध करून कायम भिजत ठेवलं. तुम्ही लवासा उभं केलं, कारखानं हाणलं, सहकार मोडीत काढलं, मागासवर्गीय सुतगीरणीच्या नावाखाली प्रस्थापित मस्तवाल डोक्यावर आणून बसवलं, त्याच गिरणीत गावगाड्यातल्या मस्तवाल बोकडाची शिफारस घेऊन आमच्या गरीबाच्या पोराला मान खाली घालून कापड शिवायला लावलं. त्यातून एखाद पोरगं गावच्या राजकारणात पुढं यायला लागलं की तुमच्या बगल बाच्यानी त्याच्यावर गुन्हे दाखल केले.

…म्हणून कोका-कोला कंपनीची जाहिरात सोशल मीडियावर दिसणार नाही

तुमच्या कपटी राजकीय करस्थानामुळे बहुजनांच पोरग मातीत गेलं. आजही कोण मेंढरं राखतय, कोण मडकी बनवतय, कोण कासर वळतय, कोण बोकड सोलतय, कोण मास धारतय, कोण हातोडा पोलादावर हाणतय, कोण म्हसर भादरतय, कोण शेपट मोडतय, कोण थापीला सिमेंट लावतय काही नाहीच मिळालं तर आजही दुसऱ्याच्या बांदाला कामाला जातंय, आणि तुमचं पोरग अंगावर खादी घालून लवासाची माप धरतय.

छत्रपती शिवरायांनी जाती पातीला कधीच थारा दिला नाही. स्वराज्य उभा राहताना बारा बलुतेदार , सोळा अलुतेदार अठरा पगड जातींनी दिलेलं योगदान तुम्ही विसरलात, राजकारणात कोण वर आलं की तुम्ही जातीच्या चिखलात त्याला तुडवलात. जातीच्या विळख्यात गुदमरून गुदमरून त्याला तुम्ही मारलत. आजच सोडून द्या पण पूर्वीसुद्धा तुमच्या बगल बाच्यानी छोट्याश्या पडळकर वाडीतल्या पोराचा एवढा तिरस्कार का केला, तो बहुजनांचा आहे म्हणून ?

“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही”,प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधींच्या देशभक्तीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह ?

वास्तव आम्ही आता ओळखलंय तुम्हाला कोरोना म्हणलेला राग नाही, आणि राग असताच तर संजय राऊतांनी उदयनराजेंच्या वंशावळीचे पुरावे मागितले तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या बगलबच्च्यांना राग आला असता. तुम्हाला राग गोपीचंदचा नाही तर त्याच्या छोट्याश्या गावात उगवलेल्या कर्तृत्वाचा आहे.तुम्हाला राग गोपीचंदने बहुजनांच्या पोराला जाग केलेल्याचा आहे. येणाऱ्या काळात सामान्य मराठा, महार , मातंग , धनगर , कोळी, वडर, चांभार, न्हावी, लिंगायत, कोष्टी, शिंपी, माकडवला नंदिवाला बारा बलुतेदारांचं पोरग राजकारणात येईल याची धास्ती तुम्हाला जास्त आहे.

( लेखातील मतं ही लेखकाची वयक्तिक असून ‘महाराष्ट्र देशा’ या मतांशी सहमत असेलच असे नाही )

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!