भोपाळ : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असताना राजकारणात मात्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा सिंह नाव न घेता त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘काँग्रेसला सभ्यता आणि संस्कृती याचं वावडं आहे. त्यांच्याकडे देशभक्ती नाही. त्यांच्यात कशी येणार देशभक्ती? कारण त्यांनी दोन दोन देशांचं सदस्यत्व घेतलं आहे. जे विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आले ते देशभक्त असूच शकत नाहीत.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
भोपाळमधील कार्यक्रमात पुढे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याल जडलेल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला होता. “काँग्रेसचं सरकार असताना नऊ वर्षे तुरूंगात होते. या काळात तुरूंगात छळ करण्यात आला. त्यामुळे मला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्या अजूनही कायम आहेत. अनेक जुन्या व्याधीही आता बळावल्या आहेत. या सगळ्या छळामुळे माझी नजर कमी झाली असून मेंदू व डोळ्यात सूज आली आहे. उजव्या डोळ्याची नजर कमी झाली असून, डाव्या डोळ्यानं बघू शकत नाही,” असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितलं होतं.
प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.
‘आरोप करण्यापूर्वी इतिहासात काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे’
पडळकर ही धनगर समाजाची नाही, तर आरएसएसवाल्याची औलाद – पाटील .
‘सरकारचे 100 दिवस पूर्ण होऊनही आमच्या ‘भावा’ला बंगला मिळेना’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

