Share

…म्हणून कोका-कोला कंपनीची जाहिरात सोशल मीडियावर दिसणार नाही

Published On: 

नवी दिल्ली : फेसबुकवर वाढत असलेल्या द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट आणि समाजातील फूट पाडणाऱया वाढत्या पोस्टमुळे फेसबुकला मोठा आर्थिक फटका बसला आहे. फेसबुककर अनेक कंपन्यांनी बहिष्कार टाकला असून परिणामी फेसबुकच्या शेअरची किंमत मोठ्याप्रमाणावर घसरली आहे.

आता मुंबईत दोन किलोमीटर परिघाबाहेर जाणं निषिद्ध

फेसबुक नेटवर्कवरून काही कंपन्यांनी जाहिराती काढून घेतल्यामुळे मार्क झुकेरबर्ग यांना ७.२ बिलियन डॉलरचा फटका बसला आहे. या सोशल मीडिया कंपनीचे शेअर शुक्रवारी ८.३ टक्क्यांनी घटले.

ब्लूमबर्ग बिलियन इंडेक्सनुसारशेअरच्या किमती घसरल्याने फेसबुकचे बाजारमूल्य ५६ बिलियन डॉलरने घसरले आणि झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती ८२.३ बिलियन डॉलरच्या खाली गेली. यामुळे झुकेरबर्ग हे चौथ्या क्रमांकावर गेले आहेत.

दरम्यान,येत्या काळात आता फेसबुकमध्येही अनेक बदल होणार असून प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या पोस्टवर इशारा देणारा झेंडय़ाचे चिन्ह दिसून येणार आहे.दरम्यान, कोका-कोला कंपनी पुढील किमान 30 दिवस सोशल मीडियावर कुठलीच जाहिरात देणार नाही. द्वेष पसरवणाऱ्या पोस्टविरोधात दबाव वाढवण्यासाठी कोका-कोला कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दारात वाढ

जगात वंशवादाला काहीच स्थान नाहीय आणि सोशल मीडियावरही वंशवादाला स्थान नसावंअसं कोका-कोलाचे चेअरमन आणि CEO जेम्स क्विन्सी यांनी म्हटलंय. सोशल मीडिया कंपन्यांनी अधिक जबाबदार आणि पारदर्शक असायला हवंअशी अपेक्षा जेम्स क्विन्सी यांनी व्यक्त केलीय बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!