मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या ईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
दरम्यान,भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. 2019 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाआघाडी ही स्वत: च्या फायद्यासाठी एकत्र आली आहे. या निवडणुकीत मोदी लाट नाही तर मोदी त्सुनामी आहे. ही त्सुनामी महाआघाडीचा पराभव करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
