Share

कोरोनाच्या संकटात देखील राजकारण सुरूच, कॉंग्रेसवर आमदारांची लपवाछपवी करण्याची वेळ

Published On: 

अहमदाबाद : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार युद्ध पातळीवर मेहनत करताना दिसत आहेत. तिकडे गुजरातमध्ये मात्र काही वेगळेच चित्र आहे. राज्यसभा निवडणूक जवळ आल्याने गुजरातमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

#corona : औरंगाबादमध्ये ६४ जणांना कोरोनाची बाधा; आता कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार

गुजरातमध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबायला तयार नाही. गेल्या दोन दिवसांत तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता ६५ वर आली आहे.

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 3 आमदारांनी राजीनामे दिल्याने कॉंग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. त्यातून त्या पक्षाने शनिवारी आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी रिसॉर्टस्‌ आणि खासगी बंगल्यांमध्ये हलवले. आता आमदारांना थेट निवडणुकीवेळीच विधानसभेत उपस्थित केले जाईल, असे समजते.

कौतुकास्पद : धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी शेकडो संघ स्वयंसेवक उतरणार मैदानात

गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ 65 पर्यंत खाली आले आहे. तर भाजपचे 103 आमदार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!