पुणे : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात राज्यातील कायद्याचे काटोकोरपणे पालन व्हावे यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमिवर कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाते.
अशीच एक घटना पुणे येथे घडली. पुण्यातील कोंढवा विभागातील पोलिस गस्त घालत असताना त्यांना एक नागरिक कारमधून विनामास्क फिरत होता. त्याला खडीमशीन चौकात आडवल्यानंतर त्याची चौकशी केली असता तो व्यक्ती आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स कडुन खेळणारा भारतीय क्रिकेटपटु राहुल त्रिपाठी हा होता. राहुल त्रिपाठी २८ मे शुक्रवारी विना मास्क कारमधून फिरत होता. यावेळी कायदा सर्वांना समान असल्याने पोलिसांनी राहुलवर कारवाई करत ५०० रुपयांचा दंड वसुल केला.
महाराष्ट्र पोलिसांनी दाखविलेल्या या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. अशीच काही कारवाई सिंधुदुर्ग पोलिसांनी भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉवर केली होती. पृथ्वी शॉ हा विना ई-पास प्रवास करत होता. पोलिसांनी शॉला तासभर थांबवले. त्यावेळी शॉने ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केला. तासाभरानंतर त्याचा ई-पास आला मग पोलिसांनी त्याला मुक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- महाराष्ट्र जिंकतोय ! राज्यात आज तब्बल ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

