बीड: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. लोकांनी विनकारण बाहेर पडू नये असे आवाहन येथील प्रशासनाकडून करणायत येत आहे. याच पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी पथसंचलन केले.
कोरोना रुग्णांची कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रिल पासून १ मे दरम्यान १५ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे केज शहरात तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर वेळोवेळी फिरून नागरिकांना अनावश्यक कामासाठी घरातून बाहेर पडू नये, रस्त्यावरील नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन करत फिरत आहेत.
मात्र काही नागरिक हे दुचाकीवर आणि पायी फिरत प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा मोकाट लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि होणारे गैरप्रकार थांबवेत यासाठी शुक्रवारी तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या समवेत पोलिस कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौक, कानडी रोड, बस स्थानक, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला या प्रमुख मार्गावरून पथसंचलन केले.
महत्वाच्या बातम्या
- यामुळे नटराजनला संघाबाहेर केले; टॉम मुडीने केला खुलासा
- ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते’
- “रवींद्र जडेजाला बीसीसीआयनं विराट कोहली इतके मानधन द्यायला हवे”
- कोरोनाचे गांभीर्यच नाही; शिरूरमध्ये संचारबंदितही लोकांचा मुक्त संचार
- सलग विजयानंतर हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या आरसीबीसाठी आनंदाची बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

