औरंगाबाद : सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारताच परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात कारवाईचा धडाका सुरु केल्याने अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दाणाणले आहे. पदभार घेऊन फक्त दोन दिवस झालेल्या महिला पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांनी कारवाईचा सपाटा लावल्याने दोन दिवसातच २५ लाख रुपयांचा मु्देमाल जप्त केला आहे, असे असताना मागील अधिकाऱ्यांना हे अवैध धंदे दिसले नाही का, की कोणाच्या वरदहस्ताने कारवाई झाली नाही अशी चर्चा जोरदार रंगत आहे.
सिल्लोड तालुक्यातील भवन-माणिकनगर येथील अनेक दिवसांपासून चालू असलेल्या ऑनलाइन लॉटरी दुकानांवर गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी ४३,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये भवन परिसरातील एका गाळ्यामध्ये लॉटरीच्या दुकानावर ऑनलाइन येणाऱ्या आकड्यावर ग्राहकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच ग्रामीण पोलिसांना सोबत घेऊन कारवाई केली. लॉटरी दुकानात पोलिसांनी छापा टाकल्यावर त्यांना सिल्लोड येथील चालक दत्ता पाथरे यांना विचारपूस केली असता त्यांनी मुळ मालक कन्नड तालुक्यातील लिंबाजी चिंचोली येथील सूरज जैस्वाल हे असल्याची माहिती दिली. चालक दत्ता पाथरे त्यांच्याजवळून ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे पूजा गायकवाड यांना वाळू माफियाचीही गोपनीय माहिती मिळाल्याने अधिकारी पूजा गायकवाड यांनी अंजना नदीपात्रातून भराडी येथे ट्रॅक्टर विना परवाना वाळू घेऊन जात असताना मिळाला. चालक समाधान शिवाजी शिंदे यांना ट्रॅक्टर विषयी विचारले असता त्यांनी मालक अंधारी येथील पांडुरंग मोरे यांच्या सांगण्यावरून मी वाळू वाहतूक करत असल्याचे सांगितले. यात एक ट्रॅक्टर, ट्राली एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिविक्षाधीन महिला पोलिस अधिकाऱ्याच्या या दबंग कारवाईमुळे सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी; लस मागवुनही केंद्राने लस पुरवली नाही – बॅनर्जी
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
- फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?
- महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करणारी भाजपा कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर का देत नाही ?
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

