🕒 1 min read
मुंबई : परिसरातील वांगणी रेल्वे स्थानकात रेल्वेरुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव पॉईंटमनने वाचवला असून हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यात एका सेकंदाचाही उशीर झाला असता तर त्या चिमुकल्याचा जीव गेला असता. या घटनेतील चिमुकल्याचा जीव वाचवणारे मयूर शेळके यांचे कौतूक करत रेल्वेमंत्र्यांनी त्याचे आभार मानले आहेत.
वांगणी रेल्वे स्थानकावर एक अंध महिला मुलासह चालत होती. प्लॅटफॉर्मच्या कडेला असताना मुलाचा तोल जाऊन तो रुळावर पडला. याच दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत होती. त्यामुळे ती महिला आरडाओरड करत होती. त्याच वेळी मयूर शेळके देवदूतासारखा धावत आला आणि त्याने मुलाला प्लॅटफॉर्मवर ढकलले. यात सेकंदाचाही विलंब झाला असता तर त्या मुलाचे प्राण गमवावे लागले असते. मयूर शेळकेने त्या मुलाला जीवदान दिले आहे.
Very proud of Mayur Shelke, Railwayman from the Vangani Railway Station in Mumbai who has done an exceptionally courageous act, risked his own life & saved a child's life. pic.twitter.com/0lsHkt4v7M
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 19, 2021
या घटनेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर मयूर शेळके यांचे कौतूक केले आहे. रेल्वेच्या पूर्ण परीवाराला मयूरचा अभिमान असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे. त्यांच्या कामाची कोणत्याही पुरस्कार किंवा रक्कम देवून बरोबरी होवू शकत नाही. तरी देखील त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत, लवकरच त्यांना पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिखर धवनचा जलवा ; काही तासातचं मॅक्सवेलकडून घेतली ऑरेंज कैप
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

