Share

देशातील सर्वच पोलिसांची स्थिती गंभीर, पवारांनी व्यक्त केली चिंता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील राजकारणासह देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी सध्या दिल्लीत असलेल्या पोलिसांच्या स्थितीवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी दिल्लीमध्ये कायदा व्यवस्थेचा प्रश्न केंद्र सरकारकडे आहे. याची दखल भारत सरकारने घेतली का ? हे माहित नाही पण त्यांनी तो गांभीर्याने घ्यावा असं म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘देशातील सर्वच राज्यांमधील पोलिसांची स्थिती गंभीर आहे. १४ ते १८ तास ड्युटी करावी लागते, आठवड्याची सुट्टी देखील पोलिसांना मिळत नाही. अशा सर्व परिस्थितीत कायदा व्यवस्था संभाळण्याची जबाबदारी असणारा वर्ग डळमळीत झाला. पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी दिल्लीच्या नागरिकांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे असंही ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी पुढे बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी ‘भाजप – शिवसेनेच्या बाजूने महाराष्ट्रातील जनतेन सत्तेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्तास्थापन करत राज्यातील जनतेला दिलासा द्यावा. कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला विरोधात बसण्यास जनतेन सांगितल आहे. त्यामुळे आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु, असं पवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आम्हाला मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी महाराष्ट्राच्या जनतेनं दिली आहे. भाजप शिवसेनेनं तातडीनं सरकार स्थापन करावं. आपल्याला राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्यात रस नाही. संजय राऊत हे नेहमीप्रमाणे भेटायला आले होते. त्यांनी आम्हाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांचे संख्याबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे ज्यांना जनतेने सत्तास्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सरकार स्थापन करावं, असंही पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1192007816069832704?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192007448850137088?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192007059648081920?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!