Share

कोरोनाच्या युद्धात मुंबईतील आणखी एक पोलिस शहीद

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्याचा आज बळी गेला आहे. ते मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. याआधीही तीन पोलीस या कोरोनाच्या युद्धात शहीद झाले होते. तर आता पर्यंत राज्यातील 6 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.

दिवसेंदिवस मुंबई पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत 700 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत चार, पुणे एक आणि सोलापुरातील एक असा समावेश आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.

दरम्यान पोलिसां पाठोपाठ आता कोरोनाने BSFच्या जवानांना देखील लक्ष्य केले आहे. आज BSFच्या ९ जवानांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांचे अहवाल हे सकरात्मक आले आहेत. सध्या या जवानांवर कोरोना हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बाधित ९ जवानांपैकी सहा जवान दिल्लीचे, १ कोलकाता आणि २ त्रिपुराचे आहेत. यापूर्वी कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात तैनात असलेल्या सीआयएसएफच्या एएसआय आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहारेकरी म्हणून नेमलेले हेड कॉन्स्टेबल रँक अधिकारी कोरोनामुळे मरण पावले होते.

महत्त्वाच्या बातम्या 

छ.संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी दारू विक्रीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

१८ मे पासून देशात पुन्हा लॉकडाऊन, पंतप्रधानांची मोठी घोषणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!