Share

१८ मे पासून देशात पुन्हा लॉकडाऊन, पंतप्रधानांची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधणार साधला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याची माहिती दिली. आर्थिक पॅकेज जाहीर करताना प्रत्येकाचा विचार करण्यात आल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं आहे.

सोमवारीच पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राज्या राज्यांमधील कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी मोदींनी ग्रामीण भागाला वाचवा भविष्यात अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी ग्रामीण भागच कमी येणार आहे, अशा सूचना दिल्या होत्या.

करोनाशी लढण्यासाठी नरेंद्र मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज

या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांचा सहभाग होता. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेणार का ? असा प्रशन विचारला जात असताना मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली अस अस मोदींनी यावेळी सांगितलं. मात्र या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी नवीन असतील अस देखील पंतप्रधानांनी स्पष्ट केल आहे.

करोनासारखं संकट आपण कधी ऐकलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. सध्या निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व आहे. मात्र थकणं, हरणं, तुटून जाणं हे आपल्याला मंजूर नाही. सतर्क राहून या युद्धाचा सामना करायचा आहे. आपल्याला जीव वाचावायचाही आहे आणि पुढे जायचं आहे. आपल्याला आपला संकल्प अजून बळकट करावा लागेल असंही मोदींनी म्हटलं आहे. आपला संकल्प संकटापेक्षा विराट असला पाहिजे. असंही मोदींनी म्हटलं आहे. आज त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

करोनाच्या संकटाचा सामना करताना जगाला चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला आहे. जगभरात पावणेतीन लाखांच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. भारतातही अनेक कुटुंबीयांनी त्यांच्या माणसांना गमावलं आहे. एका व्हायरसने जगभरात थैमान घातलं आणि जगभरातल्या कोट्यवधी लोक संकटाचा सामना करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच त्यांनी देशाला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

८० वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेची PM CARES FUND साठी 5 लक्ष रुपयांची मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!