Share

छ.संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी दारू विक्रीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

Published On: 

पुणे : राज्यातील इतर सर्व प्रश्नांपेक्षा राज्य सरकारला मद्यप्राशन करणाऱ्या लोकांची जास्त काळजी असल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारने मद्यप्रेमींसाठी आज एक आनंदाची बातमी दिली आहे. मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे. कारण राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे. मात्र, ही परवानगी फक्त दारु विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांनाच देण्यात आली आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.लॉकडाऊनदरम्यान राज्य सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. मात्र, मद्यविक्री दुकांनांबाहेर प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे अखेर राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने यासाठी काही शर्ती ठेवल्या आहेत.

अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.

डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी एक दिवस जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून ही होम डिलिव्हरीची सुविधा सुरु केला जाणार आहे.

सार्वजनिक वाहतूक येत्या 10 दिवसात सुरु करणार, नितीन गडकरींची माहिती

राज्यात 14 मे पासून ‘दारू विक्री’ला संभाजी ब्रिगेडचा विरोध…

’14 मे’ छत्रपती संभाजी महाराज यांची 363 वी जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे रोजी पुण्यामध्ये पुरंदर किल्ल्यावर झाला त्यामुळे राज्य सरकारने कपटीपणा करू नये. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा जन्मदिवस हा राज्यात ‘प्रेरणा दिन’ म्हणून ‘घरावर ‘झेंडे’ लावून साजरा केला जातो.महाराष्ट्राचा हा सण आहे. खुल्या दारू विक्रीचा निर्णय १४ मे तारखे नंतर घ्यावा… त्यादिवशी महाराष्ट्रात दारू विक्री नकोच. १४ मे रोजी दारू विक्रीला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे असं संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘आडतास’ला उत्कृष्ट साहित्यकृतीचा पुरस्कार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!